मुंबई: सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरील विनोदवीर सुनील ग्रोवर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे सध्या सुनीलची चर्चा असून नुकताच त्याचा सेटवरील नवा फोटो व्हायरल झाला आहे.
काही दिवसापूर्वी ‘भारत’च्या सेटवरील सुनीलचा एक फोटो शेअर झाला होता. या फोटोमध्ये सुनीलने फिल्मी अंदाजात पोज दिली होती. विशेष म्हणजे हा फोटो अभिनेता सलमान खानने काढल्यामुळे त्याची जास्त चर्चा रंगली होती. आता सुनीलने पुन्हा एक नवं फोटोशूट केलं असून यावेळी त्याने फोटग्राफर म्हणून कतरिना कैफची निवड केली आहे.