सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

0

मुंबई : गेल्या वर्षभरात बऱ्याच स्टारकिड्सनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ या चित्रपटातून पदार्पण केले तर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटातून लवकरच पदार्पण करणार आहे. दुसरीकडे सुहाना खान, आर्यन खान, आहाना पांडे यांसारखे स्टारकिड्स येत्या एक- दोन वर्षात रुपेरी पडद्यावर झळकतील. आता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दिग्दर्शक साजिद नाडियादवाला अहानला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ‘RX 100’ या तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमध्ये अहान मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलन लुथरिया करणार आहे. साजिद यांनी या चित्रपटाचे अधिकार नुकतेच विकत घेतले आहेत. मिलन लुथरिया यांनी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘बादशाहो’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.