सुनेनी केली सासूची हत्या

0

मुंबई : सासू आणि सून ही जोडी नेहमीच वादविवाद मध्ये असणारी मनाली जाते. अश्याच विवादावरून घरातील किरकोळ वादातून सुनेने सासूची हत्या केल्याची घटना नालासोपारा या ठिकाणी घडली आहे. नालासोपारा भागात असलेल्या अवघनगर पडखळ पाडा आचोळे या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली.

प्रीती वर्मा (वय २३ ) या महिलेने तिच्या सासूची म्हणजेच गौरी वर्माची (वय ४५) किरकोळ वादातून हत्या केली. सासू आणि सुनेचा छोट्याश्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर सुनेने म्हणजेच गौरीने तिच्या सासूवर धारदार शस्त्राने वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गौरी वर्माला अटक केली आहे. तुळिंज पोलीस ठाण्यात गौरी वर्मा विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे असेही समजते आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास ही घटना घडल्याचेही समोर आले आहे