सुप्रिम कॉलनीत महिलेला मारहाण

0

जळगाव । निवडणुकीच्या निकालावरून सायंकाळी 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनीत 29 वर्षीय महिलेला सहा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशीरा 11.30 वाजेच्या सुमारास घडली असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिता नरेंद्र कापसे (वय-29) रा. सुप्रिम कॉलनी यांना सायंकाळी 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास निवडणुकीच्या निकालाचे वाईट वाटून आरोपी ललीत शंकर कोळी, दिलीप सोनवणे, किरण खर्चे, विक्की संतोष पाटील, शंकर खर्चे, आकाश परदेशी सर्वांचे पुर्ण नाव माहिती नाही, यांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. अनिता कापसे यांच्या फिर्यादीवरून आरोपी ललीत शंकर कोळी, दिलीप सोनवणे, किरण खर्चे, विक्की संतोष पाटील, शंकर खर्चे, आकाश परदेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.