सुप्रीम कॉलनीत मोबाईल दुकान फोडले

Mobile shop broken into in Jalgaon: materials worth 31 thousand looted जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनीत मोबाईल दुकानाच्या टपरीचा पत्रा वाकवून दुकानातून 31 हजार रुपये किंमतीचे ब्ल्यूटूथ, हेडफोन व स्पीकर चोरट्यांनी लांबवले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परीसरातील पोलिस कॉलनीत मुबीन सिकंदर खाटीक (32) हा वास्तव्यास असून सुप्रिम कॉलनीजवळच मोबाईलचे साहित्य विक्री करण्याचे दुकान आहे. रविवार, 2 ऑक्टोंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास टपरीचा पत्रा वाकवून चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून 31 हजार रुपये किंमतीचे हेडफोन, ब्ल्यूटूथ, स्पिकर, केबल, चार्जर, बॅटरी असे साहित्य लांबवले. सोमवार, 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुबीन हा दुकानावर गेल्यानंतर त्याला दुकानात चोरी झाल्याचे कळताच त्याने एमआयडीसी पोलिसात धाव घेतली. तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहे.