सुया घे, पोत घे धर्तीवर चाळीसगाव तालुक्यात मिशन इंद्रधनुष्य सुरू

0

वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांची कल्पकता ; मोबाईल टिमव्दारे मोहिम

चाळीसगाव- केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने 22 ऑक्टोबर 2018 ते 22 जानेवारी 2019 या दरम्यान लसीकरणापासून वंचित राहिलेल्या सर्व बालकांना संपूर्ण लसीकरण करण्यासाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहिमेच्या तृतीय वार्षिक टप्प्याची सुरवात अतिसंवेदनशील भागात घरोघरी मोबाईल टिमव्दारे लसीकरण करून सोमवारी करण्यात आली. या मोहिमेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव अंतर्गत पाटखडकी बायपास येथील पुलाजवळील झोपडपट्टीत या मोहिमेचा शुभारंभ वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. ही मोहिम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस.कमलापुरकर, जिल्हा परीषद सदस्य अतुल देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे, पंचायत समिती सदस्य अजय पाटील, प्रीती विष्णू चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

गावोगावी जावून जनजागृती करणार
तळेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी झोपडपट्टी व अतिसंवेदनशील भागातील बालकांसाठी स्वतः व्हॅक्सिन कॅरीयर हातात घेऊन दारोदारी बालकांचा शोध घेत लाभार्थींना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेत आरोग्य केंद्रातर्फे ज्या बालकांना एखाद दुसरी अथवा पुर्ण लसीकरण झालेले नसेल त्यांना बुस्टरसह संपुर्ण लसी येत्या चार महिन्यात देण्यात येणार आहेत. 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

यांचा मोहिमेत सहभाग
आरोग्य केंद्राचया वैद्यकीय अधिकारी डॉ.आशा राजपूत, आरोग्य सहाय्यक एल.सी.जाधव, सुनंदा महाजन, आरोग्य सेविका सविता परदेशी, आरोग्य सेवक मोहन राठोड, गटप्रवर्तक ज्योत्स्ना शेलार, आशा स्वयंसेविका वंदना पिलोरे आदींसह लाभार्थीं व महिला उपस्थित होत्या.