स्पेअर पार्ट चोरणा-या दोघांना अटक
हे देखील वाचा
चाकण : ज्या कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम केले त्याच कंपनीत काही कालावधीनंतर चोरी केली. ही घटना चाकण येथे कुरुळी येथे के एस एच लॉजिस्टिक वेअर हाऊस येथे घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 लाख 10 हजार 46 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बिरेंद्र गंगाधर यादव (वय 45, रा. येवलेवाडी, ता. हवेली), संतोष अशोक कुमावत (वय 43, रा. देहूगाव, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महाले वेअर इंडिया प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापक योगेश संभाजीराव फडतरे (वय 30, रा. सारा ऑर्चिड, तळेगाव रोड चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.