यावल बसस्थानकातील प्रकार ; सीसीटीव्हीवरून चोरट्याचा शोध
यावल– सुरक्षित वाहतूक सप्ताहाच्या प्रारंभालाच बसमध्ये चढणार्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत लांबवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे. यावल बसस्थानकात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. ठगुबाई महाजन या मंगळवारी सायंकाळी दहिगाव जाण्यासाठी बस (क्रमांक एम.एच.20 डी.8597) मध्ये बसल्या असता गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांची दहा हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार रा.का.पाटील, सुशील घुगे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आगारातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती धक्कादायक माहिती समोर आली. जे कॅमेरे सुरू होते त्यातही बस उभी असलेला भाग स्पष्ट दिसत नव्हता. वृध्द महिलेने देखील कोणाला पाहिले नसल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या चोरीच्या घटनेने प्रवाशांमधून रोष व्यक्त होत आहे.