सुरत येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

0

नवापूर । सुरत येथे संत गाडगेबाबा हिंदू धोबी समाज सेवा मंडळातर्फे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सुरत येथील महानगरपालकेच्या कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष एकनाथराव बोरसे, प्रमुख अतिथी म्हणून आमदार संगीता पाटील, सुरत भाजप शहर उपाध्यक्ष छोटूभाई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र जाधव, नगरसेवक सुरेशभाई कंसागरा, सोमनाथभाई मराठे, वानखेडे, रेल्वे समिती सल्लागार पप्पूसिंग, सुरत समाज अध्यक्ष रोहिदासभाई सूर्यवंशी, उपाध्यक्ष दशरथभाऊ वाल्हे, सचिव अनिलभाई जाधव, कोषाध्यक्ष विष्णूभाई बच्छाव, दीपकभाई मोरे, महादेवभाई शेवायकर, जयेशभाई बंदरीया, भगीरथभाई शेवायकर, रामकृष्णभाऊ वाल्हे, बाबुराव शेवायकर, उत्तमराव जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

महाप्रसादाचे वाटप
यावेळी छोटूभाई पाटील, एकनाथराव बोरसे, महेंद्र जाधव, सुरेशभाई कांसाग्रा, सोमनाथभाई मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी सादिया शेख हिने ‘बेटी बचाव’ अभियानावर व्याख्यान दिले. यावेळी समाजातील जेष्ठ समाज बांधव व जेष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आले. प्रास्ताविक समाज अध्यक्ष रोहीदासभाई सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन सचिव अनिलभाई जाधव तर आभार दीपकभाई मोरे यांनी मानले. यशस्वितेसाठी विक्रम नेरकर, भागवत शिरसाळे, देविदास जाधव, प्रकाश शेवायकर, धोंडूराव वाघ, दत्तात्रय चित्ते, मोहन शेवायकर,शिवाजी शिरसाळे, पंडित जगताप, रघुनाथ शिरसाळे, गोकुळ जाधव,सोमनाथ जाधव,महेश सोनवणे,अशोक काकुळदे,मंगेश चव्हाण,किशोर मांडोळे, रमेश मोरे, युवराज शेवाळे, शरद जाधव यांनी परिश्रम घेतेले.