जळगाव । शहरातील अपघातस्थळ म्हणून नेहमी चर्चेत असणार्या पिंप्राळा रोड परिसरात अधूनमधून किरकोळ अपघाताच्या घटना घडतच असतात. एसएमआयटी महाविद्यालयाकडून दुध फेडरेशनकडे जात असलेल्या दुचाकीला मागून येणार्या 407 ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास सुरत रेल्वेगेटजवळ घडली. यात दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले. मात्र, दोन्ही चालकांमध्ये वाद झाल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
ट्रकचालकास दिला चोप
दुचाकीस्वार तरूण शनिवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास एसएमआयटी महाविद्यालयाकडून दुध फेडरेशनकडेज जात होता. मात्र, सुरत रेल्वेगेट बंद असल्यामुळे त्याने त्याची दुचाकी हळु केली. परंतू मागून येणार्या 407 ट्रकने तरूणाच्या दुचाकीला अचाकन धडक दिली. यात दुचाकीच्या सायलेन्सर तुटून नुकसान झाले. तरूणाने धडक दिल्याचा जाब चिचारताच दोन्ही चालकांमध्ये वाद सुरू झाल्याने तरूणाने ट्रकचालकाला चांगलाच चोप दिला. परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत दुचाकीस्वाराची समजूत घातली. परंतू तरूण हा दुचाकीची नुकसान भरपाई करून द्यावी असा तगादा लावत असल्यामुळे वाद वाढत चालला होता. अखेर नागरिकांनी त्याची समजूत घातल्यानंतर वादावर पडदा पडला. मात्र, या घटनेमुळे त्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.