बोदवड- तालुक्यातील सुरवाडे बु.॥ येथील शेतकरी रामचंद्र मांगो पाटील (70) या शेतकर्याने राहत्या घरी बुधवारी सकाळी साडेआठ वाजता दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. मयत पाटील यांच्यावर सुरवाडा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे थकबाजी कर्ज व्याजासह सुमारे एक लाख 82 हजार इतके कर्ज होते. शासनाचे कर्जमाफी योजने अंतर्गत पात्र होण्यास दीड लाखांवरील उर्वरीत रक्कम एक रकमी भरणे गरजेचे होते. गेल्या दोन वर्षाची नापिकीमुळे या कर्जाची परतफेड करता न आल्याने हे चिंतेत होते. मयत पाटील यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू असा परीवार आहे. याबाबत गणेश निवृत्ती पाटील यांनी खबर दिल्यावरून बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक बी.झेड.जाने करीत आहेत.