जळगाव। शिवकॉलनी परिसरातील हॉटेल चक दे जवळ सुरा घेवून फिरणार्यास रामानंद नगर पोलिसांनी मंगळवारी दुपारी 2.30 वाजता अटक केली. यावेळी त्याच्याविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश नारायण काळे (रा.सैलानी) हा मंगळवारी दुपारी शिवकॉलनीतील हॉटेल चक दे जवळ सुरा बाळगुन उभा असल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली असता दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास गणेश काळे याला पोलिसांनी सुरा घेवून फिरत असतांना मिळून आला. यानंतर त्याच्याविरूध्द पोलिस नाईक अतुल शंकरराव पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.