सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भुसावळातील नारखेडे विद्यालयात आज विविध कार्यक्रम

0

भुसावळ- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार व रविवारी विविध कार्यक्रम होत आहे. महोत्सवाला शनिवारी ग्रंथदिंडीने शोभायात्रा काढून सुरूवात होणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक तसेच विदेशात गेलेले आजी -माजी विद्यार्थी उपस्थित राहतील. शनिवारी सकाळी साडेसात वाजता हनुमान नगरातील तु.स. झोपे गुरूजी प्राथमिक विद्यामंदिरापासून ग्रंथदिंडीला सुरूवात होणार आहे. उद्घाटन खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे असतील. दुपारी दोन वाजता स्मरणिका प्रकाशन व सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील उपस्थित राहणार आहेत.

रविवारी आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
रविवारी आजी-माजी विद्यार्थी व शिक्षकांचा मेळावा होणार आहे. स्नेहमेळाव्याचे उ्दघाटन आमदार शिरीष चौधरी व शिक्षण मंडळ नाशिक विभागाचे अध्यक्ष के.बी.पाटील यांच्या उपस्थितीत होईल. समारोपासाठी लेखिका डॉ. विजया वाड उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यासाठी जवळपास 900 हुन अधिक विद्यार्थ्यांची नोंद झालेली आहे. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नारखेडे, चेअरमन पी.व्ही.पाटील, सदस्य विकास पाचपांडे, मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, मनोज कुळकर्णी, एस.एम.चिपळूणकर आदींचे सहकार्य लाभणार आहे.