मुंबई: बॉलीवूड अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांनी महिन्याभरापूर्वी मुंबईत राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येबद्दल शंका उपस्थित करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मुंबई पोलीस सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी होत आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची मुंबई पोलीस योग्य पद्धतीने चौकशी करत असून सीबीआय चौकशीची आवश्यकता नाही असे सांगितले आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी अनेक जणांची चौकशी केली. बॉलीवूडशी निगडीत कलाकार तसेच दिग्दर्शक, निर्माते यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. आघाडीचा निर्माता संजय लीला भंसाली, सुशांतची मैत्रीण रिया चक्रबर्ती आदींसह अनेक कलाकारांची चौकशी झाली आहे.