नवापूर। सध्या सुसंस्कार मिळत नसल्याने नवीन पिढी बिघडत चाललेली आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. नव्या पिढीला संस्कृतीचे ज्ञान होणे गरजेचे आहे आपली सामाजिक समृध्दता टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. सामाजिक स्स्वास्थ्य बिघडणार नाही याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृती आध्यात्मिकतेच्या माध्यमातून टिकवून ठेवली असल्याचे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणीत) त्र्यंबकेश्वर गुरुकूल पीठाधीश प.पु.गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी हितगुज राष्ट्रीय सत्संग सोहळा प्रसंगी व्यक्त केले.
पालकमंत्र्यांसह अनेकांची उपस्थिती : यावेळी पालकमंत्री तथा पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हिना गावित ,माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, विजय चौधरी, पंचायत समिति सभापती सविता गावित,नगराध्यक्षा रेणुका गावित, शेतकरी संघ अध्यक्ष अजित नाईक, जि.प सदस्या संगिता गावित, गिरिश गावित, हरिष पाटील, हेमंत पाटील, तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, माजी नगराध्यक्ष दामू बिर्हाडे आदी उपस्थित होते.
अनेक कार्यक्रमाचे आयोजन : 17 वर्षानंतर 1 मे महाराष्ट्र दिनी नवापुर येथे हितगुज व राष्ट्रीय सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात गुरुमाऊलींचे स्वागत आदिवासी संस्कृती दर्शनाने करण्यात आले. यावेळी हुतात्मा शिरीष कुमार यांना अभिवादन केले. आदिवासी संस्कार व कलाकृतीचा देशभरात प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. या सोहळ्यात धुळे,जळगाव,नाशिक, नंदुरबार सह गुजरात राज्यातुन हजारो भाविकांची उपस्थित होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. नवापूर केंद्राचे जेष्ठ सेवेकरी अशोक रणधीरे यांनी प्रास्ताविक सादर केले. नवापूर येथील स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.