सुसरी नदीवरील भराव निकृष्ट दर्जाचा

0

शहादा । शहादा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर सूतगिरणी जवळील सुसरी नदी वर बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूस केलेला भराव निकृष्ट दर्जाचा केल्याची तक्रार असून या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सूतगिरणी व खेतीय रस्त्याला जोडणार्‍या सुसरी नदी वरील पुलाचे गेल्या चार महिन्यापूर्वी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. हा पूल परिसराच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

सातत्याने अवजड वाहनांची ये-जा
सूत गिरणी मुळे या पुलावरून सातत्याने अवजड वाहनांची येजा सुरू असते. सुतगीरणीचा तयार झालेला माल इतर प्रांतात ट्रका भरून पाठवला जातो. तर शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी सुतगीरणीत आणतात त्या आधारावर आधीच या पुलाचे बांधकाम चांगल्या दर्जाचे होणे अपेक्षित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे बांधकाम केले आहे. ठेकेदाराने बांधकाम करताना पुलच्या दोन्ही बाजूच्या केलेला भराव निकृष्ट दर्जाचा करण्यात आला आहे .पावसाळ्यात भराव खचण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. सुसरी नादीचाच काठावरील काळ्या मातीचा व रेतीचा वापर करण्यात आला. वास्तविकता भराव करताना चांगल्या प्रतीचा खडी, मुरूमचा वापर करून भराव केल्या नंतर दोन्ही बाजूला दगडांची पिचिंग करण्यात आली नाही .लाखो रुपय पुलाच्या बांधकामात खर्च करण्यात आला. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गुण नियंत्रण विभाग नाशिक मार्फत चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आहे. पुलाच्या बांधकामावर जो खर्च केला आहे त्या दर्जाचे काम झाले नसल्याची तक्रार आहे.