पिंपरी-चिंचवड। थेरगाव येथे रिंग रोड बाधितांनी रविवारी महाराष्ट्र शासनाच्या नगरसचिव विभागाच्या नियमानुसार आपल्या समस्येबाबत सूचना व हरकती कशा करायच्या याचे मार्गदर्शन नागरिकांनी घेतले. घर बचाव संघर्ष समितीने कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, मनोहर पवार, बाळासाहेब उबाळे, धनाजी येळकर, नरेंद्र माने, भाळचंद फुगे, मयूर पवार, विशाल पवार , प्रशांत सपकाळ, रवींद्र पवार, योगेश इरोळे, बजरंग पवार, दीपक तरडे, प्रदीप गणगे, राजश्री शिरवळकर तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
60 हजार हरकतीचा निर्धार
यावेळी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 52 (क) नुसार अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्रशमीत संरचना म्हणून घोषित करण्यासाठी अधिनियमचे कलम 158 (1)अन्वये केलेले प्रारुप नियम हरकती सूचना घेण्यासाठी महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार थेरगावमधील घर बचाव संघर्ष समितीने थेरगाव विभागातील नागरिकांसाठी सूचना व हरकत कशा प्रकारे घ्यावयाची आहे याचे मार्गदर्शन घेतले.
60 हजार हरकतींचा निर्धार
यावेळी कमीत कमी 50 ते 60 हजार सूचना व हरकती देण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला आहे. यावेळी नितीन पंचपिंड यांनी सूचना फॉर्म उपलब्ध करून दिले. शिवाजी मोडक यांनी आभार मानले.