सूर्यकन्या तापीमातेचा जन्मोत्सव

0

भुसावळ । खान्देशाची शेतीच नाही तर समाजजीवन समृध्द करणार्‍या जीवनदायी तापीमाईच्या भुसावळ शहराला लाभलेल्या वरदानाला लक्षात घेऊन सकाळपासूनच सर्व संस्थांच्या कार्यकर्त्यांनी तापी जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला. येथील ताप्ती उत्थान आणि उत्सव सेवा समिती, सप्तश्रृंगीमाता बहुद्देशीय संस्था, माहेश्‍वरी महिला मंडळ, बालाजी महिला बचत गट, बजरंग भजनी मंडळ, विश्‍वज्योती उत्सव मंडळ अशा विविध नऊ संस्थांतर्फे शुक्रवार 30 रोजी सकाळी 11 वाजता तापी नदीवरील इंजिन घाटावर नदीला साडीचोळी अर्पण करुन पूजन करण्यात आले.

पाच जोडप्यांच्या हस्ते करण्यात आले पूजन
तापी नदीच्या पुजेला सुरेश शर्मा व राम गोपाल शर्मा या ब्रह्मवृंदाद्वारे पुजन करण्यात आले. पुजेत मुख्य यजमान अभिलाष नागला हे सपत्नीक बसले होते. त्यांच्यासोबत मोंटू वर्मा, सोमनाथ चौरसिया, राजू गुरव, नारायण नागदेव हे पाच जोडपे सपत्नीक पुजेत सहभागी झाले होते. पुजेनंतर तापीमातेची महाआरती करण्यात आली. यानंतर संस्थेचे संस्थापक प्रशांत वैष्णव, अ‍ॅड. मेघा वैष्णव, प्राची नागला, अभिलाष नागला, उमेश नेवे, राजश्री नेवे यांच्याहस्ते ओटी भरुन महावस्त्र अर्पण करण्यात आले.

101 वृक्षांचे वाटप
उपस्थित भाविकांना संतोष नागला, पंडीत रविओम शर्मा, उमाकांत शर्मा यांनी अल्पोहाराचे वाटप केले. याप्रसंगी उपस्थित भाविकांना समितीतर्फे वृक्षारोपण करण्यासाठी 101 वृक्षांची रोपे वाटप करण्यात आली. जे भाविक हे रोप जगवतील अशा भाविकांना समितीतर्फे 101 रुपये व सन्मानचिन्ह पुढील वर्षीच्या जन्मोत्सवाला प्रदान करण्यात येणार आहे.

यांनी घेतले परिश्रम
यात अभिलाष व प्राची नागला या नवदाम्पत्याने 300 झाडे वृक्षारोपणासाठी उपलब्ध करुन दिली. यशस्वीतेसाठी प्रशांत वैष्णव, उमेश नेवे, सोमनाथ चौरसिया, रविंद्र पुरोहित, गोविंद अग्रवाल, अक्षय वर्मा, अ‍ॅड. मेघा वैष्णव, जे.बी. कोटेचा, दिनेश महाजन, महेश फालक, भारती वैष्णव, कोमल नेवे, सरस्वती जाधव, श्रीकृष्ण चोखडकर, मोंटू वर्मा, विलास पाचपांडे, राजू गुरव, पुजा गुरव, सुनिल पुरोहित, सुरेश शर्मा, प्रदीप नेहेते आदींनी परिश्रम घेतले.