सेक्युलर नव्हे तर फेक्युलर : डॉ. शेवडे

0

पिंपरी-चिंचवड : ‘साम्यवाद्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे अपहरण केले आहे. त्यांचे विचार विकृत करून कोणताही संदर्भ न लावता ते समाज माध्यामात पसरवत आहे. त्यामुळे ते सेक्युलर नव्हे तर फेक्यूलर आहे’, असा टोला समाजसेवक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी लगावला. स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘नरेंद्र ते स्वामी विवेकानंद’ असा त्यांचा विषय होता. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेवक सुनिल लोखंडे, विष्णुपंत नेवाळे, सचिन सानप, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद जयंती निमित्त संतोष गर्जे यांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार, तर चंद्रकांत खंडागळे यांना भक्त पुंडलिक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

स्वामींच्या विचारांचे पाईक व्हा
शेवडे पुढे म्हणाले कि, विवेकानंद म्हणाले होते, मला शंभर तरुण द्या अवघा भारत घडवून दाखवेन. आजतागायत स्वामींच्या विचारांचे पाईक असेलेले तरुण भेटलेले नाहीत. पुरोगामी म्हणजे हिंदू असून हिंदूना शिव्या देत हिंदुत्व नाकारणारे अशी व्याख्या सांगितली. यावेळी स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट श्रोत्यांसमोर उभा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष ठाकूर तर आभार शंकर बनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र माकोड़े, सिद्राम मालगत्ती,संजय ढ़गारे, मंगेश पांडे,दिलीप खंडाळकर,दिलीप मांडवकर आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.