‘सेक्शन इंजिनिअर’ची भरती प्रक्रिया सुरू करा

0

सेंट्रल रेल्वे असोसिएशनचे डीआरएम यांना निवेदन

भुसावळ- रेल्वेची अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल सुरू असतांना दुसरीकडे सिनिअर सेक्शन इंजिनिअर भरती प्रक्रीया बंद करण्यात आली आहे. या प्रकारामुळे अभियंत्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. बंद केलेली भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी सेंट्रल रेल्वे अभियंता संघटनेतर्फे मंडळ सचिव सुनिल फिरके यांनी डीआरएम आर.के.यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. रेल्वे बोर्डाने आर.आर.बी.च्या माध्यमातून सिनिअर सेक्शन इंजिनिअर भरती बंद केली आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीची गती वाढवणे, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी रेल्वेत सक्षम अभियंत्यांची आवश्यकता असते. परंतू रेल्वे बोर्डाने पदवीकाधारक अभियत्यांची भरती करण्याचा निर्णय परिपत्रकानुसार स्थगित केला आहे. हा निर्णय लेबर फेडरेशनच्या सल्ल्यानुसार पारित करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी एक्स्पर्ट ग्रुपच्या अहवालातील पॅराच्या शिफारशीनुसार तंत्रज्ञानाच्या कामकाजासाठी बाजारातून उचित पार्श्वभूमी असलेले उमेदवार भरती होणे गरजेचे आहे. अशी मागणी फिरके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.