मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची आणि त्यांच्या मुलांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी झाली. टॉप्स सेक्युरिटी प्रकरणातही त्यांची चौकशी होणार आहे. दरम्यान ईडीकडून पुन्हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना समन्स बजावले असून सोमवारी चौकशीला बोलविले आहे. ईडीला आपण चौकशीत सहकार्य केले असून पुढेही कायम राहील असे आमदार सरनाईक यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या कंगना रानौत आणि अर्नब गोस्वामींच्या विरोधात बोललो म्हणून हेतुपुरस्सर माझ्याविरोधात ईडीला लावण्यात आल्याचे आरोपही आमदार सरनाईक यांनी केला आहे.