सेना नगरसेविकातर्फे रस्ता पूर्ववत करण्यासाठी आंदोलन

0

धुळे । देवपुरातील भरतनगर ते तुषार नगर ते सिद्धीविनायक नगर या ठिकाणी महाराष्ट्र जीवनप्राधिकरणतर्फे 136 कोटी रुपयांच्या नविन जलवाहिनी टाकण्याचे काम 8 दिवसांपासून सुरु आहे. रस्त्यावर केवळ एकाबाजूने वाहतूक वळविण्यात आली असून एकतर्फी वाहतूक डोकेदुखी ठरत आहे. खोदकामामुळे रस्त्याची दुरावस्था या ठिकाणी काही अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत.

रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करुन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी प्रभागाचे नगरसेविका ज्योत्स्ना पाटील, प्रफुल्ल पाटील, जवाहर पाटील, संजय पाटील, व्ही. एस. पाटील, महेंद्र शिरसाठ, आनंद देसले, एस. बी. पाटील व परिसरातील नागरिकांनी सदर काम बंद पाडले. विकास कामाला शिवसेनेचा विरोध नसून रस्त्याचे झालेले नुकसान संबंधित मजिप्राने पूर्ववत करुन द्यावे, यामागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती नगरसेविका ज्योत्स्ना पाटील यांनी यावेळी दिली.