धुळे । शिवसेनेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा व सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ माधुरी बोरसे यांच्या निरामय हॉस्पिटल येथे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात साहेब यांच्या हस्ते फक्त एचसीव्ही रुग्णांसाठी असलेली धुळे जिल्ह्यातील असे एकमेव मोफत डायलेसिस सुविधेचे उदघाटन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, मनपा विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, उपमहानगरप्रमुख सुनीलभाऊ बैसाणे, विजय भट्टड, संदीप सूर्यवंशी, आनंद चौधरी, प्रमोद चौधरी, युवासेनाप्रमुख पंकज गोरे, नंदू फुलपगारे, भटू गवळी जीवनदायी आरोग्य योजनेचे डॉ गोपाल जोशी, समीर खान, डॉ गिरासे, सुभाष मोरे व शिवसैनिक उपस्थित होते.
स्वतंत्र डायलिसिस मशिन
किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे रुग्णांना डायलेसिसचा आधार घ्यावा लागतो. अशा रुग्णांना वारंवार रक्त लावण्याची गरज भासते. वारंवार रक्त चढविल्यामुळे बर्याच डायलेसीसच्या रुग्णांना एचसीव्ही ह्या व्हायरसची लागण होते. या रुग्णांना वेगळ्या स्वतंत्र डायलेसिस मशीनची आवश्यकता असते. त्यांना इतर रुग्णांच्या डायलेसिस मशीनवर डायलेसिस करणे कठीण असते. एचसीव्ही बाधीत झालेल्या रुग्णांसाठी ही सुविधा मोफत देण्यात येणार आहे.