मुंबई । मुंबई,ठाणे व उल्हासनगर महापालिकेच्या तोंडावर सेनेकडून घोषणाचा पाऊस पडण्यात येत आहे. 500 फुटाच्या घरात राहणार्यांना मालमत्ता कर माफ तर 700 फुटापर्यंतच्या घरात राहणार्यांना मालमत्ता करात सुट देण्याची शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी घोषणा केली तर ठाणेकरांना पाण्याची टंचाईवर मात करण्यासाठी धरण बांधले जाईल.सेंट्रल पार्क आणि खारेगावमध्ये सिंगापूरच्या धर्तीवर चौपाटीचा विकास अशा घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे युतीविषयी तिढा कायम आहे. युतीविषयी सेना-भाजपाच्या नेत्यांमध्ये तीन बैठका पार पडल्या आहे. मात्र अद्यापही कोणताही निर्णय झालेेला नाही. युती होणार की नाही या समभ्रमात कार्यकर्ते आहे. जागा वाटपावरुन दोन्ही पक्षात चर्चेच्या फेर्या होत आहे. मात्र युतीच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. चर्चा सुरु असून अद्याप भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास दोन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठी चर्चा करतील असे त्यांनी सांगितले. मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी घोषणाचा पाऊस पडला आहे.
मिराभाईंदर जलवाहतुकीला प्राधान्य
खारेगावमध्ये सिंगापूरच्या धर्तीवर चौपाटीचा विकास केला जाईल. तसेच मीरा भाईंदर आणि ठाण्यात जलवाहतुकीला प्राधान्य देऊ असे आश्वासन त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी घोषणांचा पाऊस पाडला आहे.
सेंट्रल पार्क बनविणार
ठाणेकरांच्या पाणीप्रश्नावर धरण बांधण्याचे आश्वासन वजा घोषणा केली आहे. वीकएंडला विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण असावे यासाठी कोलशेतमध्ये सेंट्रल पार्क तयार केले जाईल असे त्यांनी सांगितले. 30 एकरच्या जागेवर हा पार्क तयार केला जाणार असून या पार्कमध्ये थीम पार्क, लहान मुलांसाठी प्ले झोन, थीम पार्क, तलाव असेल असे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या निवडणुकीवर सेनेकडून मुंबईप्रमाणेच ठाणेकरांनाही घोषणांचा पाऊस सेनाप्रमुखांकडून होत आहे.
धरणाचे आश्वासन
मुंबईप्रमाणेच ठाणेकरांनाही उद्धव ठाकरेंनी मालमत्ता करात सूट देण्याचे आश्वासन दिले. 500 फुटापर्यंतच्या घरात राहणार्या मालमत्ता कर माफ तर 700 फुटापर्यंतच्या घरात राहणार्यांना मालमत्ता करात सूट दिली जाईल असे ठाकरे यांनी जाहीर केले. ठाण्यातील पाणीटंचाईवर मुंबई हायकोर्टानेही चिंता व्यक्त केली होती. याचा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिकेसाठी आम्ही स्वतंत्र धरण बांधले. शिवसेनेची सत्ता आल्यास ठाण्यासाठीही स्वतंत्र धरण बांधले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.