सेनेची जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी

0

जळगाव । आगामी काळात होत असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून शिवसैनिकांनी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करावी, असे आदेश सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. शिवसेनेची बैठक शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात होत असलेल्या निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची तयारी सुरु होती. परंतु मित्र पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने निवडणूक स्वबळावरच लढविण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत युतीकरण्यासंबंधीचा निर्णय झाला नसल्याने जिल्ह्यातील निवडणूक देखील स्वबळावरच लढविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी असे आदेश देण्यात आले.

सेनेतर्फे 13 जागेवर उमेदवार घोषीत
युतीची चर्चा सुरु असतांनाच युतीसंदर्भात ठोस निर्णय होत नसल्याने शिवसेनेने अखेर आपले 13 उमेदवार घोषीत केले आहे. निवडणूक जाहिर होण्याअगोदरच शिवसेनेने पाच जागांवर उमेदवार घोषीत केले होते. आता शिवसेनेने आठ जागेवर उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. यात पारोळा तालुक्यातील देवगाव-तामसवाडी समिर वसंतराव पाटील, वसंतनगर -तरसोद रत्नाबाई रोहिदास पाटील, म्हसवे -शेडगाव सुनिल यशवंत पाटील, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव गटातून नाना पोपट महाजन, रावेर तालुक्यातील पाल-केराडा- मानसी महेंद्र पवार, विवरा -वाघोद मुबारक तडवी, निंभोरा -तामसवाडी-भास्कर विठ्ठल पाटील, ऐनपूर-विरवड-सुलोचना पाटील या आठ उमेदवारांची उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे. यापूर्वी पिपंळगाव-शिंदाड गटातून उध्दव मराठे, नगरदेवळा-बाळद वृंदावली सोमवंशी, लोहार-कुर्‍हाड- रेखा राजूपत, निंभोरा -तांदलवाडी भास्कर पाटील या पाच जागांवर सेनेकडून उमेदवार घोषीत करण्यात आले होते.

25 जागा जिंकण्याचे लक्ष
आगामी काळातील जिल्हा परिषद निवडणूकीत शिवसेनेची सर्व जागांवर निवडणुक लढविण्याची तयारी आहे. सद्यस्थितीत जळगाव जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 14 सदस्य असून या निवडणूकीत 15 जागा अधिक जिंकण्याचा संकल्प करण्यात आला असून सेनेने 25 जागांवर विजय मिळविण्याचे लक्ष ठेवले आहे.

भाजप कार्यकर्ते सेनेत दाखल
निवडणूक जाहिर होताच आयाराम गयारामांचा पक्षप्रवेशाचा सत्र सुरु आहे. पाथरी येथील माजी सरपंच भिमराव चिंतामण पाटील, माजी पंचायत समिती सदस्य बळवंत रामदास पाटील (ऊर्फ बाळू आबा), माजी विकास सोसायटी चेअरमन सावकाश लोटन पाटील यांनी एैन निवडणूकीच्या काळात भाजपातून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपाच्या गोट्यात खळबळ माजली आहे.