सेनेची निवडणुकीसाठी तयारी

0

नवापूर। नवापूर नगर पालिकेच्या निवडणूकी संदर्भात शहरातील सर्व आजी माजी पदाधीकारी शिवसैनिक व अंगीकृत संघटनांची बैठक येथील अग्रवाल भूवन येथे नंदुरबार जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरातयांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीत बबनराव थोरात म्हणाले की शिवसेना हा जनसामांन्याचा पक्ष आहे. यात वडा पाव विकणारा ,पेपर विकणारा, पानटपरी चालवणारा, नगरसेवक, महापौर, आमदार खासदार ,मंत्री होऊ शकतो. जेष्ठांचा सन्मान व तरूणांना योग्य स्थान व सन्मान आहे हे शिवसेनेचे धोरण आहे. शिवसैनिकांमध्ये जोश भरतांना थोरात म्हणाले की ठरले आता मनासी धोरण नवापूर नगर पालीकेवर बांधू आता भगवे तोरण, भगवे तोरण. आणि हे प्रत्यक्षसाकार करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावे. महिला या उत्तम प्रचारक असुन त्या घरातल्या चुली पर्यत जाऊन प्रचार करतात त्याच उत्तम संघटक आहेत. महिला आघाडी चांगले काम करत आहे. शिवसेनेत हजारो शिवसैनिकांपेक्षा 10 निष्ठावंत शिवसैनिक चालतील. शिवसेनेत पद ही नाव मिरविण्यासाठी नसुन काम करण्यासाठी आहे. नगरपालिका निवडणुक येत आहे शिवसैनिकांनी प्रत्येक प्रभागात फिरुन विद्यमान नगरसेवकांचा कामाचा लेखाजोखा जमा करुन त्यावर अभ्यास करण्याची गरज आहे. नगर पालिकेत सर्वच पक्षांची सत्ता आली आहे मात्र शिवसेनेचा भगवा अद्याप का फडकलेला नाही यावर शिवसेनिकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

थोरात यांनी घेतली शिवसैनिकांची हजेरी
बेैठकीत बबनराव थोरात यांनी शिक्षकांप्रमाणे सर्व प्रथम शिवसेना पदाधिकारी यांचा नावाची यादी हातात घेऊन हजेरी घेतली. यावेळी काही पदाधिकारी अनुपस्थित होते त्यांचा नावावर पेनाने त्यांनी गैरहजेरी लावली. यावेळी ते बाहेर गेल्याचे सांगितले असता थोरात यांनी काही एक न ऐकता त्यांचावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. बैठकीत महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. बैठकीत माईक अचानक आवाज करु लागल्याने वारवांर वक्त्यांना व्यत्यय येत होता. त्यावर आमशा पाडवी यांनी विरोधकांचे यंदा बारा वाजणार असल्याते हे संकेत असल्याची मार्मिक टिका केली.

प्रचाराचा ’मास्टर प्लॅन’ तयार
नगरपालिका निवडणुक प्रचार प्रसाराचा मास्टर प्लॅन तयार झाला असुन पुर्ण ताकतीने शिवसेना निवडणुकीत उतरणार आहे. शिवसेनेने केलेली आंदोलने,मातब्बर प्रस्थापितांना न घाबरता केलेला आज पर्यतचा संघर्ष ही शिवसेनेची बाजु व इतिहास आमचा जेमेची बाजु आहे. शिवसेना नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करणार असुन यंदा शिवसेनेचा भगवा नगर पालिकेवर फडकल्या शिवाय राहणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. यानंतर नंदूरबार उप जिल्हा प्रमूख हसमूख पाटील, लोकसभा संघटक भगवान बापू करणकाळ जिल्हा प्रमूख आमशा पाडवी, महिला आघाडी जिल्हा संघटक रिना पाडवी, महिला आघाडीच्या विद्या चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तावीक गणेश वडनेरे यांनी तर सूत्रसंचालन मनोज बोरसे तर आभार प्रविण ब्रम्हे यांनी मानले.

इच्छुकांची भाऊगर्दी
यावेळी तालूका प्रमूख गणेश वडनेरे,शहर प्रमूख गोविंद मोरे ,महिला आघाडीच्या उप जिल्हा संघटक ज्योती चौधरी, तालुका संघटक मोगीता गावित, शहर संघटक उज्वला वडनेरे , लिला मराठे तसेच शिवसेना यूवा सेना ,कामगार सेना, वाहतूक सेना, शिव उद्योग सेना तसेच इतर अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच निवडणुकीतील इच्छुक उमेदवार मोठ्या संखेने उपस्थित होते.