सेनेच्या उपमहापौरांच्या नावाने लाखाची खरेदी ; टेम्पो चालकाला अटक

0

ठाणे : शिवसेनेच्या विद्यमान उपमहापौर यांच्या नावाचा वापर करीत इलेक्ट्रॉनिक दुकानात तब्बल ९५ हजाराचे ३ एलसीडी खरेदी करून पोबारा करणाऱ्या अज्ञात भामट्यांचा शोध मुंब्रा पोलीस करीत आहेत. या प्रकरणी एलसीडी टेम्पोत घालून नेणाऱ्या टेम्पो चालक नारायण सिंह राजपुरोहित याला अटक केली आहे. पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुंब्रा कॉलोनी रोड, मुंब्रा हॉस्पिटल्सच्या जवळ असलेल्या लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक दुकानाचे मालक लक्ष्मण शर्मा याना बुधवारी १९ एप्रिल रोजी मोबाईलवर फोन आला “मी उपमहापौर रमाकांत मढवी बोलतोय, मी नवीन कार्यालय सुरु करतोय तीन एलसीडी आणि दोन एससी टेम्पो पाठवितो तेव्हा सामान पाठवून द्या असे सांगितले. फोन नंतर काही वेळातच एक टेम्पो दुकानासमोर आला. दुकानदार शर्मा यांनी टेम्पोत ९५ हजाराचे तीन एलसीडी टीव्ही टेम्पोत टाकले. एसी उपलब्ध नसल्याने उद्या एसी घेऊन जा असे शर्मा यांनी टेम्पो चालकाला सांगितले. दुकानदार लक्ष्मण शर्मा हे उपमहापौर मढवी याना म्हणून जास्त चौकशी केली नाही. मात्र एसी उपलब्ध नसल्याने शर्मा यांनी मढवी याना फोन लावताच उपमहापौर मढवी यांनी कुठलेही एलसीडी मागविले नसल्याचे सांगताच अप्लाय फसवणूक झाल्याचे समजले. याबाबत त्वरित मुंब्रा पोलीस ठाण्यात २० एप्रिल,२०१७ रोजी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंब्रा पोलिसांनी मात्र त्वरित तपस करीत टेम्पोतून ३ एलसीडी घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालक नारायण सिंह राजपुरोहित याला अटक केली. दरम्यान टेम्पो चालक राजपुरोहित यांनी मात्र मला भाडे दिल्याने मी एलसीडी घेण्यासाठी आलो जेव्हा सामान घेऊन गेलो तेव्हा ती व्यक्ती मुख्य रस्त्यावरच उभा होता. त्याने मला भाडे दिले आणि सामान टेम्पोतून उतरवून घेतले. भाडे देणाऱ्या व्यक्तीला आपण ओळखीत नसल्याचे पोलिसांना सांगितले. आता पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.