गुवाहाटी (प्रतिनिधी) : शिवसेनेतील बंडखोर आमदार गेल्या तीन दिवसांपासून गुवाहाटीत मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दाखल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत असताना आता शिवसेनेने बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत तर सेनेच्या या पवित्र्यानंतर बंडखोर आमदारांमध्ये अस्वस्था पसरली आहे. राज्यातील काही आमदारांच्या कार्यालयाची संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केल्याची घटना घडल्या आहेत व या सर्व राजकीय परीस्थितीचा अंदाज बांधून शनिवारी गुवाहाटी येथील रॅडीसन ब्लू हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांची बैठक सुरू असून या बैठकीनंतर सर्व आमदार अंतिम निर्णय घेणार आहेत शिवाय या बैठकीनंतर सर्व आमदार रविवार, 26 रोजी मुंबईला परत येण्याचा निर्णय होऊ शकतो जर आमदार परत आले की ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेट घेतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.