मुंबई- शेअर मार्केटच्या या आठवड्यातील आज शुक्रवार शेवटचा दिवस आहे. आज शेअर मार्केटची सुरुवात चांगल्या अंकानी झाली. सेन्सेक्स १३८.१६ अंकांनी वाढून ३५ हजार ३९८.७० वर सुरु झाले. निफ्टीत देखील वाढ झाली आहे. २७.३० अंकांनी वाढून निफ्टी १०६४४ वर सुरुवात झाली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये सुस्ती पाहायला मिळत आहे. बीएसई मिडकॅप इंडेक्स ०.१५ टक्के वाढले आहे. निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्स खाली गेले.