सेरेना विलियम्सचा न्यूड फोटो व्हॅनिटी फेअरच्या मुखपृष्ठावर झळकल्यापासून सोशल मीडियात जबरदस्त धुमाळी माजली आहे. इतकी चांगली खेळाडू तर आहे. ते करायचे सोडून भलतेच चाळे कशाला? इ. त्यात ती गरोदर आहे, ते पोट दाखवत तिने पोझ दिलीय म्हणजे तर अतिच वाटतंय लोकांना…
पण सेरेनाने हे का केलं असेल? टेनिस जगतातल्या विख्यात खेळाडूला ऑलिम्पिक चॅपियनला चिप पब्लिसिटी स्टंट करायची तर गरज नाहीच. मग तिने आपले शरीर जगापुढे उघडे करण्यामागचे कारण काय? एक कारण म्हणजे इश्ररलज्ञ खी इशर्रीींळर्षीश्र हे आंदोलन. गुलामगिरीच्या पगड्याखालील समाजात काळी त्वचा ही कुरूप, काळी माणसे हीन समजली जातात. एका बाजुला काळी शरीरे मरमर कामासाठी वापरायची, काळ्या स्त्रियांची शरीरे वासनेसाठी ओरबाडून खायची पण दुसरीकडे ती तुच्छ मानायची. सुंदरतेची व्याख्या काय तर गोरी त्वचा, निळे डोळे, सोनेरी केस… टोनी मॉरिसनच्या लर्श्रीशीीं शूश मध्ये नाही का ती छोटीशी काळी मुलगी रोज प्रार्थना करते, देवा मला निळे डोळे दे. त्या बागेत येणार्या सोनेरी केसांच्या सुंदर मुलींसारखे… मग मला पण त्यांच्यासारखा प्रेम करणारा डॅडी मिळेल. हा माझ्याशी घाणेरडी कामे करणारा दुखावणारा स्टेप डॅडी नाही! आपण सुंदर नाही म्हणून आपल्याला प्रेम, यश मिळू शकत नाही, असे वाटणार्या मुली भारतातही कमी नाहीत. पण इश्ररलज्ञ झीळवश ने या संकल्पनेला तडा दिला. आम्ही सुंदर आहोत, बघा आमच्याकडे असे म्हटले.
सेरेनाचा हा फोटो हे सौंदर्य, गर्व दर्शवतो. तेजस्वी झळकती त्वचा, खेळाडूचे कमावलेले शरीर, पीळदार दंड आणि हात, उंच मोठे नितंब जे आफ्रिकन स्त्रियांची खासियत ओहत. कॅमेरा समोर शरीराची फक्त डावी बाजू दिसत असल्याने गुप्तांग दिसत नाही. उजव्या हाताने छाती झाकली असल्याने स्तनही दिसत नाहीत. पण गरोदर पोट मात्र प्रकर्षाने उठून दिसत आहे. याकरता बाई म्हणून, आई म्हणून मला हा फोटो भलताच आवडला. गरोदरपणात आपण बेढब झालोय असे न मानता खुषीने, गर्वाने स्वत:कडे पाहावे असे सांगणे आहे तिचे. आपल्याकडे हे करू नको, ते करू नको, काळजी घे, असे ऐकण्यात, चिंता करण्यात नऊ महिने निघून जातात. (पण सेरेना मात्र गरोदर असताना टेनिस मॅच खेळली, जिंकली आणि बरी तब्येतीनेही मस्तच राहिली.) जास्त हालचाल न केल्याने, अनावश्यक तुपाचे पदार्थ खाल्ल्याने शरीर फुगते, पाय सुजतात आणि मग नैसर्गिक प्रसूती सोडून सिझेरिअनचा मार्ग धरावा लागतो. सेरेनाचा पुढचा प्रवासही विनासायास आणि आनंदाचाच होईल…
आपल्याकडे एकदा आई झाली, किंवा व्हायची झाली, की बाई डर्शुीरश्रळीूं पासून दूर गेली असे मानतात. स्त्री ही एक क्षण पत्नी व अनंतकाळची माता असते म्हणे… अरे पण प्रेयसी कोठे गेली? गरोदरपणात तर हार्मोन्स भलतेच वरखाली होत असतात आणि डर्शुीरश्रळीूं र्ीीसश वाढवतात. या नैसर्गिक भावनांना काबूत आणायला मग आपल्याकडे गर्भसंस्कार शिबिरे आहेत. वेद, गीता वगैरे ऐकवून पोटातल्या मुलांनाही संस्कारी करून टाकायला…! हिंदूत्ववादाने समाजजीवनात असा वेगवेगळ्या मार्गांनी प्रवेश मिळवला आहे. मी अशा एका िीशसपरपलू लश्ररीी ला गेले होते. तिथे ते सांगू लागले की, गरोदर बायकांनी मन शांत ठेवावे. गीता वाचावी. मला प्रश्न पडला, गीता तर कुरुक्षेत्रावर उभे ठाकले असता आपल्या कुटुंबियांना, गुरुंना ठार मारावे म्हणून अर्जूनाला कृष्णाने केलेला उपदेश. त्याने शांती कशी मिळणार? यावर समोरच्या बाई म्हणाल्या, नको तर, तुम्ही रामायण वाचा. श्रोत्यांनीही माना डोलावल्या. हो बुवा आम्ही रामायण वाचतो. मी म्हणाले, पण कुठपर्यंत वाचायचं? नऊ महिन्याच्या गरोदर सीतेला रानात नेऊन टाकली- की खातील जंगली जनावरे, स्वत:चा बचावही करता येणार नाही तिला… ते तर वाचायचे नसेल आम्ही? नाहीतर भीती बसायची की बरा आहे नवरा आत्ता, लाडबिड करतोय, पण वेळ आली की टाकायचा नेऊन कुठेतरी… वर मर्यादा पुरुषोत्तम म्हणवायचा!
सेरेनाने या सगळ्याला छाट मारली आहे. कमरेभोवती चांदीची साखळी घालून ती दाखवतेय, मी वशीळीरलश्रश आहे. आणि मला वशीळीशी आहेत. पाठीवर मोकळे सोडलेले लांब केस स्वतंत्र, स्वच्छंदी स्वभावही दाखवतायत. जरा बघाच एकदा फोटोकडे नीट लज्जा, भीड सोडून. सेरेनाच्या नजरेने…
भाग्यश्री गायकवाड,
क्रिएटिव्ह रायटर