सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान

0

मुंबई- घराघरात आज बाप्पांचे आगमन झाले आहे. देशभर गणेशाच्या आगमनाची धामधूम सुरू आहे. दिग्गज सेलिब्रिटींकडे बाप्पा आज विराजमान झाले आहे. टीव्ही इंडस्ट्रीच्या अनेक सेलिब्रिटींच्या घरीही धूमधडाक्यात बाप्पा अवतरले.

ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र आणि एकता कपूरच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. जितेन्द्र, तुषार कपूर आणि तुषार कपूरच्या मुलाने बाप्पाचे मनोभावे पूजन केले. एकताने घरच्या बाप्पाचा फोटो शेअर केला आहे.

सलमान खानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरा यांनी बाप्पाला घरी आणले.

शिल्पा शेट्टीने उत्साहात बाप्पांचे स्वागत केले.

टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी याच्या घरची ही बाप्पांची सुंदर आरास.

करण टेकर याच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले.

क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या घरी देखील आज बाप्पांचे आगमन झाले आहे.