सेल्टिकचा दणदणीत विजय

0

मुंबई । करण कपूर, अझफर नूरानी आणि भावेन परमारने नोंदवलेल्या गोलांच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर सेल्टिक एफ. सी. संघाने 16 व्या वांद्रे वेस्ट फुटबॉल लीगमधील प्रीमीअर डिव्हिजनच्या लढतीत कांत वाडी संघाचा 10-0 असा दणदणीत पराभव केला. पहिल्याच लढतीत संघाला मोठा विजय मिळवून देताना सेल्टिकच्या करण कपूर, अझफर नूरानी, भावेन परमारने गोलांची हॅट्ट्रिक साधली. संघाचा 10 वा गोल शेन फ्लेचरने केला.

वांद्रे वेस्ट फुटबॉल असोसिएशन आयोजित स्पर्धेतील अन्य लढतीत चिंबई स्पोर्ट्स क्लबने कॅर्मेलाईट्स संघाला 4-4 असे बरोबरीत रोखले. चिंबई संघासाठी फ्रांसिस कॅब्राल आणि फ्लॉईड धर्मी यांनी प्रत्येकी दोन गोल केले. कॅर्मेलाईटस् संघासाठी निखिल देवकरने दोन आणि ऑग्डेन फर्नांडेस आणि डेंझिल मॅकेरेहन्स यांनी प्रत्येकी एक गोल केला.