मुंबई: अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गोल्ड’ या चित्रपटाला देशभक्तीचीही जोड देण्यात आली असून यामध्ये अक्षय कुमार तपन दासची भूमिका साकारणार आहे, तर मौनी रॉय त्याच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. मौनी रॉयचा बॉलिवूडमध्ये या चित्रपाटातून डेब्यु आहे. मात्र मौनीला हा चित्रपट सलमान खानमुळे मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरु असतानाच मौनीने याविषयी एक खुलासा केला आहे.
‘गोल्डमधून पहिल्यांदाच माझा बॉलिवूडमध्ये प्रवेश होणार आहे. मात्र जर कोणाला असं वाटत असेल की हा चित्रपट मला सलमान खानमुळे मिळाला आहे. तर त्यांनी ‘गोल्ड’च्या दिग्दर्शकांना याबाबत नक्की विचारा. सलमानमुळे मला हा चित्रपट मिळाला अशा अफवा कोण पसरवतय हे मला काही समजतच नाही’, असं मौनी म्हणाली.
दरम्यान, मौनीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे तिला चित्रपटासाठी सलमानने कोणतीही मदत केलेली नाही ही स्पष्ट दिसून येत आहे.