सेल्फीच्या नादात दोन तरुणांचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू

0

यवतमाळ: दोन तरुणांचा सेल्फी काढण्याच्या नादात पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. सेल्फी काढत असताना बोट उटलल्याने ही दुर्घटना झाली. दरम्यान या दुर्घटनेत तीन तरुण वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आदिलाबाद येथून आलेले पाच मित्र बोट घेऊन नदीपात्रात उतरले होते. पाचही मित्र आंघोळ करण्यासाठी पैनगंगा नदीत उतरले होते. यावेळी बोटीत बसून सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. मात्र सेल्फी काढत असताना बोट उलटी आणि सर्व तरुण बुडाले.

या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तिघे वाचले आहेत.