जळगाव । एचडीएफसी बँकेतून बोलत असल्याचे भासवत के्रडीट कार्डचा नंबर विचारून 2 लाख 82 हजार 979 रुपयांची ऑनलाईन खरेदी करून चोरट्याने सुरेश कलेक्शन येथील सेल्समनची फसवणुक केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. दरम्यान, चोरट्याने 19 जूनला 92 हजारांची तर 24 जून 1 लाख 90 हजार 979 रूपयांची खरेदी केली आहे. याप्रकरणी सेल्समनने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 व 24 जून रोजी केली खरेदी
महाबळ परिसरातील अनुराग स्टेट बँक कॉलनी येथे अनिलकुमार जयवंतराव लगाडे (वय-59) हे पत्नी, मुलगा व आईसोबत राहतात. तर नवीपेठतील सुरेश कलेक्शन या कपड्यांच्या दुकानावर गेल्या 20 वर्षापासून सेल्समन म्हणून कामाला आहे. 19 जून रोजी त्यांना मोबाईल कॉल आला. एचडीएफसी बँकेतून बोलत असल्याचे सांगत तुमचे रिवार्ड कॉईनची रक्कम जमा करायची आहे. तर तुमचे क्रेडीचा कार्डचा नंबर सांगा असे सांगितले. अनिलकुमार लगाडे यांनी विश्वास ठेवून त्यांना लगेख क्रेडीट कार्डचा नंबर सांगितला. परंतू क्रमांक सांगितल्यावर काही वेळानंतर त्यांना 92 हजार रुपयांची खरेदी केल्याचा मेसेज मोबाईलवर आला. यानंतर 24 जूनला पुन्हा त्यांच्या के्रडीट कार्डवरून भामट्याने फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपींग साईडवरून 1 लाख 90 हजार 979 रूपयांची खरेदी केल्याचा त्यांना पुन्हा मसेज मोबाईलवर आल्यानंतर अनिलकुमार यांना त्यांची फसवणुक झाल्याचा संशय आला.
बँकेत केली विचारणा
मोबाईलवर खरेदी केल्याचा मसेज आल्यानंतर अनिलकुमार लगाडे यांनी लागलीच एचडीएफसी बँकेत संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी 19 जून रोजी 92 हजार तर 24 रोजी 1 लाख 979 रुपयांचे टान्झेक्शन झाल्याचे सांगताच अनिलकुमार यांना फसवुणक झाल्याचे कळाले. अनिलकुमार यांनी कुठलाही व्यवहार केले नसल्याचे बँकेत सांगितल्यानंतर बँकेतील अधिकार्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. यानंतर शनिवारी रात्री अनिलकुमार लगाडे यांनी शहर पोलिस स्टेशन गाठत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ऑनलाईन पध्दतीने बँकेच्या खात्यातून रक्कमा काढण्याच्या प्रकारात वाढ होत असून ग्राहकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.