चाळीसगाव – दहिवद येथील रहिवासी जितेंद्र रमेश पवार हे सैन्यदलात १७ वर्षे देश सेवा करुन निवृत्त झाले. त्या निमित्ताने दहीवद गावातील आजि माजी जवानांची गावातुन मोठ्या धुमधडाक्यात वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. त्या वेळेस दहीवद गावातील प्रत्येक घरोघरी महिलांनी औक्षण केले व संपूर्ण मिल्ट्रीच्या जवानांचे *दहीवद येथील उपसरपंच तथा शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव हरी खलाणे यांच्या सहकार्याने सत्कार* करण्यात आला. यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष बापुसो. लक्ष्मण भाऊ शिरसाठ,सुधाकर आबा वाघ, चिंधा आबा वाघ, मा. सरपंच भिमराव पवार, अशोक खलाणे, हींमत निकम, गोरख पवार ,ग्रामपंचायत सदस्य नितिन बागुल, कल्याण खलाणे, भुषण साळुंखे, शरद वाघ, कल्याण वाघ, भानुदास वाघ, भास्कर वाघ, सुकदेव पवार तसेच भैया पवार,भुरा मास्तर यांनी सुत्र संचालन केले व योगेश वाघ यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी लखन मोरे भाईदास बोरसे,अमोल वाघ वाल्मिक गुरुजि यांनी परीश्रम घेतले