सेवानिवृत्त डॉक्टरला मारहाण,तिघांवर अ‍ॅट्रासिटी

0

परस्पर विरोधी तक्रारी दाखल : डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा

इंदापूर : बाभुळगाव (ता.इंदापूर) येथिल डॉ.सुभाष विरप्पा लांबतुरे यांना दगडाने मारहान करण्याचा प्रयत्न व जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी आमोल इंगळे,गुलाब इंगळे,राजेंद्र इंगळे(रा.बाभुळगाव) यांचेविरूद्ध जातीवाचक शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी प्रकरणी त्यांच्यावर अणुसुचित जाती जमाती प्रतीबंधक कायद्यानुसार त्यांचे विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर डॉ. लांबतुरे महिलेच्या विनयभंगाप्रकरणी व डॉक्टर पत्नीविरोधात दागीने लांबविल्याचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.

जीवे मारण्याची धकमकी दिली
याबाबत घटनेची हकिकत अशी की,दिनांक 3 मार्च 2018 रोजी फिर्यादी डॉ.सुभाष विरप्पा लांबतुरे.(वय.60) रा.बाभुळगाव ता.इंदापूर जि.पूणे हे व त्यांचे गावातील इतर लोक शिवाजी जावळे,हणूमंत आसबे,भारत आसबे,अंकुश मोरे,व नाना चव्हाण यांना घेवुन बाभुळगाव हद्दितील स्वमालकीची जमीन नांगरट व जमीन मोजणी करण्यासाठी सकाळी शेतात गेले असता शेजारील बांधकरी अमोल गुलाब इंगळे,गुलाब बाबु इंगळे,राजेंद्र गुलाब इंगळे शेतात आले व अडवणुक करून मी जमिनीची मोजणी करायची नाही असे म्हणत हातात दगड घेवून लांबतुरे यांच्या अंगावर धावुन गेले.तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दीली.तुला शेती बागायत करू देणार नाही म्हणत जातीवाचक शिविगाळ केली. याप्रकरणी इंदापूर पोलीसांनी अणूसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायदा अ‍ॅक्ट 3(1),(4), (5),504,506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा
दरम्यान पंचेचाळीस वर्षीय विवाहित महिलेने डॉ. सुभाष लांबतुरे यांच्या विरुद्ध विनयभंगाचा तर डॉक्टरच्या पत्नी विरुद्ध दागीने हिसकविल्याची मंगळवारी (दि.6) रात्री इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.पोलिसांनी सांगितले ,की 2 मार्च 2018 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पिडित महिला स्वतः च्या शेतात केळीचे पीक पाहण्यासाठी गेली असता डॉक्टर सुभाष लांबतुरे यांच्या शेतातील उस तुटुन गेल्यामुळे शेतातील पाचट पेटविले होते. त्या आगीची धग सहा ते आठ झाडांना लागली होती. झाड सुकलेली दिसली .उसाच्या शेताचा बांद देखील फोडलेला दिसला. त्यामुळे डॉक्टर सुभाष लांबतुरे व त्यांची( पत्नी नाव माहित नाही) यांना भेटले. त्यावेळी त्यांच्या सोबत अनोळखी चार जण होते. डॉक्टर लांबतुरे यांनी माझा हात धरुन लज्जास्पद वर्तन केले तर डॉक्टर यांच्या पत्नीने माझ्या डोक्याचे केस ओढले,गळ्याला ओरबाडून साडेतीन तोळ्याचे साखळीगंठण व तीन पदरी सोन्याचा पाच तोळ्याचा राणी हार किंमत 2 लाख 10 हजार रूपयांचा ऐवज हिसकावून घेऊन निघून गेले या आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली. इंदापूर पोलिसांनी डॉक्टर सुभाष लाबंतुरे यांच्या विरुद्ध विनयभंग तर त्यांच्या पत्नी विरुध्द लुबाडणूक केल्याचा अनोळखी चार जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.