सेवानिवृत्त शिक्षकाला 42 हजाराचा लावला चुना

0
जळगाव – जामनेर तालुक्यातील सोनाडे येथील सेवानिवृत्त शिक्षकाला बोलण्यात गुंतवून अज्ञात दोन भामट्यांनी त्यांच्याजवळील बँकेचे एटीएम बदलवून बंद पडलेले एटीएम देवून दुसऱ्या ठिकाणी परस्पर एटीएम मधून 42 हजार रूपये काढल्याचा प्रकार 18 सप्टेंबर रोजी घडला. हा प्रकार सेवानिवृत्त यांच्या पुतण्याच्या लक्षात आल्यानंतर जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सेवानिवृत्त शिक्षक हिरोजी बाबुराव पाटील (वय-73) रा. सोनाले पोस्ट पाळधी ता. जामनेर हे डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी 9.45 वाजता सोनाले येथून जळगावला बसने आले. त्यानंतर एसबीआय बँकेच्या खात्यातून एटीएमच्या माध्यमातून काढण्यासाठी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत एटीएममध्ये 10 हजार रूपये काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते आले नाही. पुन्हा 5 हजार रूपयांची रक्कम टाकली तरी देखील आले नाही. त्यावेळी मागे उभे असलेले दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना चार हजार रूपये टाकून बघा असे सांगितल्यानंतर त्याप्रमाणे 4 हजार रूपये एटीएम मधून निघाले. त्यानंतर हिरोजी पाटील यांनी पुन्हा दोनवेळा 4 हजार रूपये असे एकुण 12 हजार रूपये एटीएम मधून काढले.
12 हजार रूपये काढल्यानंतर ते लगेचच दृष्टी हॉस्पिटलमध्ये डोळे चेक करून पुतण्याकडे कुसुंबाला गेले. दुसऱ्या दिवशी पुतण्याकडे एटीएम दिले असता ते एटीएम चंदूराम यांच्या नावाने असल्याचे आढळले. त्यानंतर सोनाळे येथील स्टेट बँकेत जावून पासबुक चेक केले तर त्यांच्या खात्यात एकुण 54 हजार रूपये होते. सुरूवातील त्यांनी 12 हजार रूपये काढले तर उर्वरित 42 हजार रूपये अज्ञात व्यक्तींनी बेंडाळे चौकातील एटीएम जवळून पैसे काढले. आपली फसवणूक झाली असे लक्षात आल्यानंतर सेवानिवृत्त हिरोजी पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यांविरोधता जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास पीएसआय मनोज वाघमारे करीत आहे.