जळगाव : आदर्शनगर परिसर माहेश्वरी सभा आणि जळगाव शहर व तालुका माहेश्वरी महिला संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सेवा-त्याग सदाचार आदर्श 2017 लघू नाटीकेचे आयोजन करण्यात आले. 12 मिनीटाच्या या लघूनाटीकेतून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकून समाजप्रबोधन करण्यात आले. माहेश्वरी समाजातर्फे शहरातील महेश प्रगती मंडळ मंगलकार्यालयात सेवा-त्याग सदाचार आदर्श 2017 या लघू नाटीकेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील समस्त माहेश्वरी समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी समाजबांधवांनी विशेष पोषाक परिधान केले होते. लघू नाटीकेसाठी जिल्ह्यातील 8 संघ सहभागी होते. त्यात जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील एक संघ तर जळगाव शहरातील 7 संघांचा समावेश होता. लघू नाटीकेसोबतच नृत्याविष्कारही सादर करण्यात आले. महेश वंदना, गणेशवंदना, शिववंदना नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. नाटीकेचे प्रायोजनकर्ते रमेश मोटार ड्रायव्हिंग स्कुल,भाऊसाहेब हरनारायणराठी बहूउद्देशीय विकास प्रतिष्ठान, भाग्यश्री पोलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड, सुप्रीम इंडस्ट्रिज, पलोड डिस्ट्रीब्युटर्स हे होते. प्रथम क्रमांक मिळविणार्या संघाला ट्रॉफी आणि 3100 रुपये बक्षीस देण्यात आले. प्रथम तीन पारितोषीकासह उत्तेजनार्थ दोन पारितोषीक देण्यात आले. लघूनाटकाचे परिक्षण चिंतामण पाटील, विना कांकरीया, सारीक लढ्ढा यांनी केले.