एजबस्टन । भारत-पाकिस्तान सामन्यातील समालोचनादरम्यान विश्रांती घेणार्या सौरव गांगुली आणि शेन वॉर्न यांचे फोटो ट्विट करत सेहवागने ट्विट केले आहे. एजबस्टनमधील या समालोचनाची जबाबदारी सौरव गांगुली आणि शेन वॉर्न यांच्याकडे होते. समालोचनादरम्यान काही वेळ ब्रेक घेत गांगुली आणि वॉर्न झोपले होते. या दोघांचे फोटो ट्विटरवर प्रसिद्ध करित त्यावर म्हणाला की,‘आपली स्वप्नेच आपल्या भविष्याला आकार देतात. त्यामुळेच हे दिग्गज स्वप्ने पाहत आहेत. झोपण्याची मजा,’ असे सेहवागने ट्विटमध्ये म्हटले आहे. सेहवागने या ट्विटमध्ये सौरव गांगुली आणि शेन वॉर्नला मेन्शनदेखील केले आहे.