जळगाव : आजी माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी प्रथमच राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन 4 व 5 जानेवारीला जवान फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. माजी सैनिक व विधवांना त्यांच्या मुला-मुलींचे लग्न जुळविण्यासाठी ओळखी अभावी योग्य स्थळ शोधण्यासाठी अडचणी येतात. ही अडचण दुर करण्यासाठी आजी-माजी सैनिक पाल्यांसाठी राज्यस्तरीय वधू-वर मेळावा सैनिक विश्रामगृह जळगाव येथे होणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी 25 डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज जवना फाऊंडेशनच्या नावाने पाठवायचा आहे. यासोबतच सैनिक मेट्रोमोनियल डॉटकॉम या वेबसाईटचे नियोजन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. या वधू-वर मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून सैनिक समाज उपस्थित राहणार आहे. वधू-वर मेळाव्याच्या निमित्ताने सैनिक बांधव एकत्र येणार असून त्यांच्या विचाराची देवाण घेवाण मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. अधिकाधीक सैनिक बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जवान फाऊंडेशनचे अध्यक्ष ईश्वर मोरे यांनी केले आहे.