पिंपळनेर । घोडदे गावातील ग्रामस्थाचा आगळा-वेगळा उपक्रम देशसेवेच्या रक्षणांसाठी गेलेल्या गावातील युवकांचा (जवान) चा देशसेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर जन्मभूमीत वाजत गाजत गावभर मिरवणूक काढण्यात आली. घोडदे ता.साक्री येथील जवान अनिल अर्जुन क्षिरसागर हे सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन घरी परतले व त्यांचे जन्मभूमी घोडदे ता.साक्री गावात जंगी स्वागत करण्यात आले.
औक्षण, श्रीफळ देऊन स्वागत
अनिल क्षिरसागर हे येथील प्रगतीशील शेतकरी अर्जुन दोधू क्षिरसागर यांचे चिरंजीव आहेत. क्षीरसागर यांना दोन भाऊ व एक बहिण आहे. त्यांची पत्नी पल्लवी यांचे माहेर कावठे ता.साक्री येथील आहे. अनिल क्षीरसागर यांना एक मुलगा चि.कन्हैयालाल व एक मुलगी कु.पायल आहे. अनिल क्षीरसागर यांचे प्राथमिक तर माध्यमिक शिक्षण घोडदे येथे (महात्मा फुले माध्य व उच्च माध्य.) येथे झाले. पुढील शिक्षण साक्री येथील सि.गो.पाटील येथे झाले. नंतर पुणे येथे सैन्यात 2001 मध्ये भरती झाले. त्यानंतर त्यांनी येथे प्रशिक्षण घेऊन त्यांची मराठा बटालियन मध्ये वर्णी लागली. त्यांनी मराठा बटालियनमध्ये राहून पं.बंगाल, राजस्थान, राजूरी, ग्वाल्हेर, लडाख, श्रीनगर, पुझ, गांधीनगर, येथे सेवा बजावली. व 1 फेब्रुवारी 2018 सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त निमित्ताने अनिल क्षिरसागर यांची गावात ढोल-ताशांच्या गजरात गावभर वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली व क्षिरसागर यांचे गावातील प्रत्येक घरी औक्षंण करून श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले.