सैन्य भरतीत गैरप्रकाराला वाव नाही

0

मेजर जनरल सतीश वासाडे यांची माहिती
जळगाव – गेल्या तीन ते चार वर्षांपासून सैन्य भरतीचे स्वरुप बदलले आहे. या भरतीत गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी येतात, उमेदवारही गैरप्रकाराला बळी पडतात. मात्र अत्याधुनिक प्रणालीमुळे निवडीपासून ते नियुक्तीपर्यंतची सर्वप्रक्रिया 100 टक्के पारदर्शक असून अत्याधुनिक प्रणालीमुळे प्रक्रियेत गैरप्रकाराला वाव नाही. उमेदवारांनी कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये, असा सल्ला महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचे व सात विभागीय कार्यालयांचे प्रमुख असलेल्या मेजर जनरल सतीश वासाडे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिला.

जिल्हा प्रशासनाचे आभारी आहोत
शहरात सुरु असलेल्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी ते आले आहेत. यादरम्यान त्यांनी क्रीडा संकुलात पत्रकारांशी वार्तालाप केला. पहिल्यांदाच भरतीत ऑनलाईन प्रक्रियेव्दारे अर्ज मागविण्यात आले असून बायोमॅट्रीक पध्दतीने उमेदवारांची ओळख परेड करुन त्यांना प्रवेश देण्यात येत आहे. यानंतर सर्व प्रक्रिया पारदर्शक असून लेखी परिक्षेनंतर उमेदवारांची नियुक्तीही त्याच्या गुणांवर संगणकीय प्रणालीव्दारे ठरविणार असल्याचे ते म्हणाले. माझ्या कारर्कीदीत पहिल्यांदाच जळगाव असा जिल्हा आहे तेथून पहिल्यांदा 17 हजार एवढे उमेदवारांनी अर्ज केले असल्याचेही ते म्हणाले. ऑनलाईन प्रक्रिया, रेकॉर्डींग व निकाल ही प्रक्रियेत कुणाचाही व कुठलाही हस्तक्षेप होतच नाही, असेही त्यांनी सांगितले.

जालन्याचे 298 उमेदवार मेडीकलसाठी पात्र
शहरात सैन्य भरती कार्यालय (एआरओ), औरंगाबादतर्फे 9 जिल्ह्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात तिसर्‍या दिवशी जालना जिल्ह्यातील उमेदवारांची प्रक्रिया पार पाडली. यात एकूण 5092 उमेदवारांपैकी 298 उमेदवार वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरले आहेत.