मुंबई। इंडोनेशियन ओपन बॅटमिटन स्पर्धेत भारताच्या बॅटमिंटन पटूंनी चांगली कामगिरी केली. इंंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताच्या श्रीकांत किदम्बीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात श्रीकांतने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या सॉन वॅन हू 21-15, 14-21, 24-22 पराभव केला.
भारताला सुवर्णपदकाची आशा
उपात्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या सॉन वॅन हू व श्रीकांत मध्ये रंगला. पहिला सेट श्रीकांतने सहज जिकला.पहिल्या सेटमध्ये सॉन वॅन हू ने अनेक बॅकहँड रॅलीचा वापर करुन सामन्यात परत येण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीकांतने सॉनला ही संधीच दिली नाही. पहिल्या सेटच्या अखेरपर्यंत गुणांची आघाडी कायम ठेवत श्रीकांतने सेट जिंकला.
दुसर्या सेटला श्रीकांतने सुरवातीला चांगला खेळ केला.मात्र सॉनने आपल्या सर्वोत्तम खेळ करून हा सेट आपल्या नावावर केला. दोन्ही खेळाडूंनी एक -एक सेट जिकल्याने तिसर्या सेटमध्ये उत्कांठा वाढली. दोन्ही खेळाडूच्या गुणामध्ये 1-2 गुणांचे अंतर होतेे. अखेरच्या सेटमध्ये 22-22 अशी बरोबरी झाल्यानंतर श्रीकांतने आघाडी घेत सामनाही आपल्या नावे केला. आता अंतिम सामन्यातही अशीच कामगिरी करत श्रीकांत भारताला सुवर्णपदक मिळवून देईल अशी आशा सर्व क्रीडारसिक करतायत.