जळगाव : पिंपरी पुणे येथे 5 वी मिनी महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जळगाव येथील बारा वर्ष वयोगटाने सांगली संघाला पराभुत करित अजिक्यपद मिळविले. तर 10 वर्ष वयोगटातील संघाला तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेसाठी राज्यातुन 18 संघ सहभागी होते. संघाचे व्यवस्थापक म्हणुन गौरव पाटील यांनी तर प्रशिक्षक म्हणुन प्रितेश पाटील, कल्पेश कोल्हे यांनी काम पाहिले. विजयी संघाचे जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील, क्रिडा अधिकारी चांदुरकर, प्रा. संजय जाधव, आंतरराष्ट्रीय खेळाडु जयेश मोटे यांनी क्रीडा संकुलात खेळाडुचा सत्कार केला. तर मंत्री गिरिष महाजन, आमदार चंद्रकांत सोनवणे, सुरेश खार, पी. पाटील, अॅड. प्रदिप, प्रशांत जगताप, डॉ. दिनेश पाटील, प्रा. डॉ. संजय चौधरी, किशोर चौधरी, प्रा. किरण नेहते यांनी खेळाडुचे अभिनंदन केले.