32 संशयितांविरुध्द गुन्हा दाखल
सोनगीर- सोनगीर गावात भाजी विक्रेत्यांमध्ये गाडी लावण्याच्या वादातून शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन गट समोरा-समोर आले. किरकोळ दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी रविवारी पहाटे पावणे चार वाजता 32 संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल आहे .पहाटेचा धरपकड करत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस दाखल झाले होते.
धुळे पोलीस रात्रीच सोनीगरमध्ये दाखल
धुळ्यातूनही पोलीस अधिकारी, कर्मचारी सोनगीरला रवाना झाले होते. दोन जणांमधील वाद विकोपाला गेल्याने भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन गट समोरा-समोर भिडल्याने आणि दगडफेकीमुळे सोनगीर गावात तणाव निर्माण झाला होता. परिणामी भितीचे वातावरण तयार झाल्याने उलट-सुलट अफवा पसरल्याने घटनेचे गांभिर्य पहाता धुळ्यातूनही पोलिसांचा मोठा फौजफाटा सोनगीरला रवाना झाला होता. सोनगिरात तणावपुर्ण शांतता आहे.
रविवारी पहाटे अटक सत्र
रविवारी पहाटे पावणे चार वाजता संशयित 32 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दीपक अशोक माळी (24), संतोष भगवान अहिरे (28), बुधा भगवान माळी (34), प्रशांत प्रभाकर चव्हाण (31), हर्षदखान फरीदखान कुरेशी (27), वसीम खान मोसीन खान (22), शेरु खान अब्बास खान (46) या संशयितांना रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे करीत आहेत.