सोन्याचे भाव 600 रुपयांनी झाले कमी

जळगाव – रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या जागतिक बाजारातील पडझडीमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोने गुंतवणूक वाढवली आहे.मात्र गुरुवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. बुधवारी सोने तब्बल 1630 रुपयाने तर गुरुवारी सोन्याचे भाव पुन्हा 600 रुपयाने कमी झाले.
जळगाव सराफ बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,500 रुपये प्रति तोळा होते. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सोने लवकरच 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या आठवड्यातील दर?
सोमवार – 51,400
मंगळवार – 51,400,
बुधवारी – 53,030
गुरुवारी – 52,500