सोन्यापेक्षा तीसपट महाग चहा पावडर

0

आजकाल चहा महाग होत चाललाय हे खरं आहे. पण तुम्ही कधी कल्पना केलीय का की सोन्यापेक्षागी महाग चहा असू शकतो. आपण एखाद्या दुकानात जाता आणि दुकानदार आपल्याकडे छोट्या पाकिटाचे दहा हजार डॉलर मागू लागला तर कसे वाटेल. हे खरं आहे. एक चहा पावडर अशी आहे की तिची किंमत सोन्याहून 30 पट महाग आहे. दाहुंग पाओ नावाची चहा पावडर जगातली सर्वाधिक महागडी चहा पावडर आहे.

आपला विश्वास नाही बसणार पण हे धादांत सत्य आहे. दाहुंग पाओ सोन्या पेक्षा 30 पट महाग आहे. चहापावडर इतकी महाग का हा प्रश्न पडलाच पाहिजे. दाहुंग पाओ चहाचे रोप अतिशय दुर्मिळ आहे. चीनचे लोक म्हणतात की या चहाच्या पानांमध्ये हजारो रोग बरे करण्याची शक्ती आहे, गुणधर्म आहेत. पाण्यापासून होणारे रोग घालविणे ही तर या चहाची खासियतच आहे. चीनमध्ये मींग राजघराण्यातील राणीची तब्बेत एकदा बिघडली तेव्हा हुशार वैद्याने दाहुंग पाओ चहा तिला पाजला. तेव्हापासून या चहाच्या गुणधर्मांची ख्याती चहुकडे पसरली.