जळगाव। सलमान बाबु पटेल याचा मृतदेह मेहरूण तलावात आढळून आला होता. या बाबत त्याच्या वडीलांनी घातपाताचा संशय व्यक्त करून संशयीतांची नावे पोलीसांना दिली. परंतु संशयीतांवर कारवाई न झाल्याने मयत सलमानचे कुटुंब सोमवार 17 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणार आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी संबंधितांना दिले आहेत.
मेहरुण तलावात आढळला होता मृतदेह
21 मे रोजी सलामन यास त्याच्या घरा जवळील दोन मुलांनी बोलवुन नेले. त्यानंतर रात्रभर सलमान घरी आला नाही. दुसर्या दिवशी याबद्दल एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार केल्याच्या दुसर्या दिवशी मेहरूण तलावात सलमानचा मृतदेह तरंगतांना दिसून आला. सलमान हा पट्टीचा पोहणार होता. त्यामुळे पाण्यात बुडुन त्याचा मृत्यु होणे अशक्य आहे. त्याचा घातपात करून खुन करण्यात आला आहे असा संशय नातेवाईकांकडून वर्तविण्यात येत होता. त्यानंतर नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतरही सलमानच्या मारेकर्यांना शोधण्यात पोलीसांना यश आले नाही. 10 जुलैपर्यंत मुलाच्या मारेकर्यांना अटक न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचे पत्र त्यांनी 23 जून रोजी पोलीस अधिक्षकांना पत्र दिले होतेे. परंतु संशयीत दोन्ही मारेकर्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने बाबु ईसा पटेल, अरमान बाबु पटेल, हाजराबी बाबु पटेल व यास्मिन बाबु पटेल हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसत आहेत.