सोमवारी रोजगार मेळावा

0

पिंपरी : येथील संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने सोमवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. खासदार अमर साबळे यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे महापौर नितीन काळजे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते आझम पानसरे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रकाशित केलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यात 10 वी 12 पास, डिप्लोमा, अभियांत्रिकी पदवी, पदवीकाधारक, व्यवसायीक पदवी व पदवीकाधारक, आयपीओ, बीपीओ, आयटी, हॉटेल मॅनेजमेंट, बँकींक, फायनान्स, फार्मास्युटिकल्स्, मार्केटिंग क्षेत्रातील बेरोजगार युवक, युवतींनी आपल्या शैक्षणिक व अनुभवाच्या कागदपत्रांच्या दोन सेटसह सकाळी 10 वाजता नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या कार्यालयासमोरील पटांगणात उपस्थित राहावे. असे आवाहन केले आहे.